Events Gallery

वन महोत्सव २०२१

वन महोत्सव २०२१

आदर्श शैक्षणिक समूहाने नेहमीच विविध कार्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे व या माध्यमातून समाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे. १ जुलै २०२१…आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री. धनराजजी विसपुते सर व मा.सौ.संगिता विसपुते मॅडम यांची कन्या कु.धनश्री विसपुते यांचा वाढदिवस या दिवसाचे औचित्य साधून व सामाजिक नियमांचे पालन करून श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल च्या प्रारंगणात वृक्षारोपण करण्यात आले व वृक्षसंवर्धनाचा निर्धार करण्यात आला.

राजर्षि  छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती व  सामािजक न्याय दिवस ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती व सामािजक न्याय दिवस ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नविन पनवेल च्या वतीने शनिवार दिनांक २६ जुन २०२१ रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती व सामािजक न्याय दिवस ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मा.डॉ. मिनाक्षी मोरे मॅडम जेष्ठ प्राध्यापिका, आचार्य जावडेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन गारगोटी मौनी विद्यापीठ कोल्हापूर ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२१

आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२१

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल तर्फे दि. २६/६/२०२१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रसिद्ध योग मार्गदर्शक मा. श्री. पीटर डिसूजा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

‘वाचन दिन’ अंतर्गत एक आगळा वेगळा उपक्रम ‘वाचा एक तरी पुस्तक ‘

‘वाचन दिन’ अंतर्गत एक आगळा वेगळा उपक्रम ‘वाचा एक तरी पुस्तक ‘

आदर्श शैक्षणिक समूहातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा खास उपक्रम
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री बापूसाहेब डी.डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय,नवीन पनवेल येथे दि. १९ जुन २०२१ रोजी ‘वाचन दिनाचे ‘आयोजन करण्यात आले होते. सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य मा. डॉ. सीमा मॅडम यांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते .

कोव्हीड मार्गदर्शन व मानसिक समुपदेशन कौशल्य विकास ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

कोव्हीड मार्गदर्शन व मानसिक समुपदेशन कौशल्य विकास ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

आदर्श शैक्षणिक समूह संचालित श्री. बापुसाहेब डी. डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवीन पनवेल येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद, शिक्षण मंत्रालय,
भारत सरकार अंतर्गत,
*कोव्हीड मार्गदर्शन व मानसिक समुपदेशन कौशल्य विकास ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन व कोव्हीड समुपदेशन कक्षाचे उदघाटन*
दि. १२/६/२०२१ शनिवार संध्याकाळी ४.०० वाजता zoom वर व फेसबुक लाईव्ह करण्यात आला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२१

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२१

आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री बापुसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेल
येथ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर मा. जगदीशभाई गायकवाड व मा. विद्याताई गायकवाड, शिक्षण सभापती व नगरसेविका प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.धनराजजी विसपुते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व त्यानुसार देशाचा विकास कसा साधता येईल यावर आपले विचार व्यक्त केले.

आविष्कार २०२१

आविष्कार २०२१

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपूते बी.एड./एम.एड. महाविद्यालय, पनवेल मधील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठ अंतर्गत १५ व्या आंतर महाविद्यालय/संस्था/विभाग “अविष्कार” संशोधन परिषद:२०२०-२१ द्वारे आयोजित संशोधन आराखडा स्पर्धेत अंतिम निवड प्रक्रियेत निवड झाली.

ग्रंथालयशास्त्र व संशोधन विषयावर ऑनलाईन परिसंवाद

ग्रंथालयशास्त्र व संशोधन विषयावर ऑनलाईन परिसंवाद

श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन व माजी विद्यार्थी संघ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, मुंबई विभागीय केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालयशास्त्र व संशोधन या विषयावर ३१/०३/२०२१ रोजी ऑनलाईन परिसंवाद कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विनायक लोहार सरांनी सादर केले.

National Level Webinar On “Teachers Role in New Education Policy (NEP) 2020 Implementation”

National Level Webinar On “Teachers Role in New Education Policy (NEP) 2020 Implementation”

Dr. Seema Kamble, Principal, Shri. Bapusaheb D.D Vispute college of Education, New panvel in the introductory speech of the webinar had introduced about the adarsh group of Institutes, Bharatiya Shikshan Mandal & NITI aayog. She welcomed guests, dignitaries, participants on behalf of Shri. Bapusaheb D.D. Vispute College of Education, New Panvel and gave a brief overview on the objectives of the webinar.