Founder’s Statue Inauguration


रविवार दि.२४/०२/२०१९ रोजी आदर्श शैक्षणिक समुहाचे संस्थापक,अध्यक्ष शिक्षणमहर्षी कै.बापूसाहेब डी. डी. विसपुते उर्फ ऋषीमहाराज यांचा पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा , लोकसभा अध्यक्ष मा.ना. ताईसाहेब श्रीमती सुमित्राजी महाजन यांच्या शुभहस्ते , धुळे येथील आदर्श शैक्षणिक समूहाच्या प्रांगणात चेअरमन मा.श्री. धनराजजी विसपुते व मा.श्री.नानासाहेब विसपुते यांच्या नेतृत्वाखाली साजरा झाला. सदर कार्यक्रमा प्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री मा.ना. डाॅ.सुभाषजी भामरे यांची विशेष उपस्थिती लाभली. धुळे म.न.पा. चे महापौर मा.श्री. चंद्रकांत बापूजी सोनार यांच्यासह अनेक श्रेष्ठ मान्यवर उपस्थित होते. पुतळ्याचे अनावरण झाल्यावर दीपप्रज्वलनाने औपचारिक कार्यक्रमाची सुरुवात झाली, पुलवामा येथील हुतात्म्यांना भावपूर्ण अशी आदरांजली वाहून त्यानंतर टप्प्याटप्प्याने कार्यक्रमात रंग भरत गेले. मा. ताईंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत ताईंना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. ताईंच्या जीवनावर आधारित जीवनपट दाखवून अश्या दैदिप्यमान व्यक्तिमत्वास मानपत्र प्रदान करण्यात आले. अनेक क्षेत्रांत अविश्र्वसनीय कामगिरी केल्या बद्दल आठजणांना गुणगौरव पुरस्कार तसेच एकाला ॠषितुल्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मा. ताईंनी त्यांच्या मार्गदर्शनातून स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून दिले व कै. बापूसाहेब विसपुते यांनी स्त्री शिक्षणाची गंगा तळा गाळापर्यंत पोहोचविली असे सांगितले , त्याच प्रमाणे मनमाड इंदौर लोहमार्गामुळे खानदेश च्या विकासाचे द्वार उघडेल असा आशावाद मांडला. हा मार्ग म्हणजे माझ्या सासर माहेरचं नातं आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं. कार्यक्रमा नंतर सहभोजनावेळी मार्मिक गप्पा मारत ताईंनी त्यांच्या आवडत्या पद्धतीच्या पदार्थांची लज्जत चाखली. आदर्श शैक्षणिक समूहातील सर्वांना यथेच्छ आशिर्वाद देऊन मा. ताईंनी सर्वांचा निरोप घेतला. आदर्श शैक्षणिक समूहाच्या सचिव श्रीमती संगीता विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श शैक्षणिक समूहातील “शिक्षणमहर्षी कै. बापूसाहेब डी. डी. विसपुते उर्फ ऋषीमहाराज यांचा पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा समिती ” मधील सर्व सदस्यांच्या अथक प्रयत्नाने सदर सोहळा यशस्वीपणे साजरा झाला.
Great Words said By Nelson Mandela that Education is the most powerful weapon wich one can use to change the world. This powerful weapon of Education has used by great leader, Shikshan Maharshi & Founder president of Adarsh Group Late Shri. Bapusaheb Vispute & spread the education to people from rural areas & contributed in their development.
24th Feb 2019 is the Golden Day in the History of Adarsh Group of Institute & Shri D. D. Vispute College of Pharmacy as Statue of Late Shri Bapusaheb Vispute was inaugurated at Dhule by Auspicious hands of Hon. Sumitra Tai Ji Mahajan, Speaker of Loksabha, Govt. of India, in presence of Hon. Subhash Ji Bhamre, Minister of state for defense, Hon.Shri Dhanraj Vispute Sir, President of Adarsh Group of Institute and Hon.Shri Mahendra Ji Vispute Sir, Vice President, Hon.Shri Bapusaheb Sonar, Mayor, Dhule Muncipal Corporation & Hon. Shri Anup Ji Agrawal, BJP president, Dhule District, Hon.Mrs. Sangita Ji Vispute, Secretory, Adarsh Group & Hon. Smita Ji Vispute. Glad to share that Inauguration of Adarsh Scientific Research Center & Food Testing Lab has also done by these honorable dignitaries followed by Unveiling of “Smarnika” & “Karyanand”.