Events Gallery
B.Ed. and M.Ed. Opening 2022
आदर्श शैक्षणिक समूह संचालित श्री.बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये बी.एड व एम.एड. वर्ष 2021-23 चे उदघाटन आणि मराठी दिवस ऑनलाईन पद्धतीने जल्लोषात साजरा करण्यात आला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल तर्फे दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
“यिन” च्या निवडणुकीत श्री.बापुसाहेब डी.डी. विसपुते शिक्षणशास्र महाविदयालाच्या विदयार्थ्यांची निवड
“सकाळ”च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या यंग इन्सिरेटर्स नेटवर्क अर्थात “यीन”च्या पहिल्या टप्यात घेण्यात आलेल्या, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते शिक्षणशास्र महाविदयालय पनवेलतर्फे बी.एड. द्वितीय वर्षाच्या तारिणी मोरे यांची अध्यक्षपदी व गौरी उबाळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पनवेल डी . डी. विसपुते महाविद्यालयाचे घवघवीत यश !….
श्री. बापूसाहेब डी . डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन , नवीन पनवेल येथील मुंबई विद्यापीठ अंतर्गत एम . एड. अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहीर झाला. सदर परिक्षेत आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थीनी श्रीमती व्हीनस समिर सावळा हीने एकूण ८२.७६% मिळवत मुंबई विद्यापीठात व्दितीय स्थान पटकावले आहे.
स्वातंत्र्य दिन 2021
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेल येथे १५ ऑगस्ट २०२१ रोजी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. ७५ व्या स्वातंत्र्य दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. विक्रांतजी पाटील, पनवेल म.न.पा. चे उपमहापौर मा.श्री.जगदीशजी गायकवाड यांची उपस्थिती लाभली या वेळी सर्व सामाजिक नियमांचे पालन करून प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रस्तुत प्रसंगी अतिथींनी सर्वाना शुभेच्छा देत आदर्श समूहाच्या कार्याचे कौतुक केले.
राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस २०२१
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेल येथे दि..१२/०८/२०२१ रोजी “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस” साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे मॅडम यांनी याप्रसंगी भारतीय ग्रंथालयाचे जनक सी. रंगनाथन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
४ दिवसीय बी.एड व एम.एड. प्रवेश परीक्षा मार्गदर्शन चर्चासत्र
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार बी.एड. व एम.एड. प्रवेशासाठी प्रवेशपूर्व (CET) परीक्षा देणे अनिवार्य आहे. प्रवेशपूर्व परीक्षा दिल्यानंतरच विद्यार्थी बी.एड. व एम.एड.प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. उच्च व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षा देणे आवश्यक आहे. या परीक्षेमध्ये विद्यर्थ्यांचीअभियोग्यता,बुद्धिमत्ता, तपासली जाते.आदर्श शिक्षण समूह संचालित श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एजुकेशन नवीन पनवेल आणि बोर्ड ऑफ स्टडीज (एजुकेशन)युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ४ दिवसीय बी.एड व बी.एड प्रवेश परीक्षा मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
वन महोत्सव २०२१
आदर्श शैक्षणिक समूहाने नेहमीच विविध कार्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे व या माध्यमातून समाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे. १ जुलै २०२१…आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री. धनराजजी विसपुते सर व मा.सौ.संगिता विसपुते मॅडम यांची कन्या कु.धनश्री विसपुते यांचा वाढदिवस या दिवसाचे औचित्य साधून व सामाजिक नियमांचे पालन करून श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल च्या प्रारंगणात वृक्षारोपण करण्यात आले व वृक्षसंवर्धनाचा निर्धार करण्यात आला.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती व सामािजक न्याय दिवस ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नविन पनवेल च्या वतीने शनिवार दिनांक २६ जुन २०२१ रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती व सामािजक न्याय दिवस ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मा.डॉ. मिनाक्षी मोरे मॅडम जेष्ठ प्राध्यापिका, आचार्य जावडेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन गारगोटी मौनी विद्यापीठ कोल्हापूर ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२१
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल तर्फे दि. २६/६/२०२१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रसिद्ध योग मार्गदर्शक मा. श्री. पीटर डिसूजा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.