स्वातंत्र्य दिन 2021

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेल येथे १५ ऑगस्ट २०२१ रोजी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. ७५ व्या स्वातंत्र्य दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. विक्रांतजी पाटील, पनवेल म.न.पा. चे उपमहापौर मा.श्री.जगदीशजी गायकवाड यांची उपस्थिती लाभली या वेळी सर्व सामाजिक नियमांचे पालन करून प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रस्तुत प्रसंगी अतिथींनी सर्वाना शुभेच्छा देत आदर्श समूहाच्या कार्याचे कौतुक केले.
आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन आणि भाजपा शैक्षणिक संस्था प्रकोष्टचे प्रदेश सहसंयोजक, दादासाहेब मा.श्री. धनराजजी विसपुते, सचिव, मा.श्रीम. संगिता विसपुते तसेच इतर विश्वस्त व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संस्थेतील प्राध्यापकांनी व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात संपादन केलेल्या यशाबद्दल त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी सर्व प्राध्यापकांचे व कर्मचाऱ्यांचे त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले