Aadarsh Vidyaratn Purskar Sohala 2020

शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते व संचालिका मा.सौ.संगिता विसपुते यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने आदर्श शैक्षणिक समूहाच्या, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज, नवीन पनवेलमध्ये “आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२०” हा कार्यक्रम दिनांक ५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता ऑनलाइन संपन्न झाला.या कार्यक्रम साठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ.अजयजी भामरे, अधिष्ठाता, वाणिज्य विद्याशाखा मुंबई विद्यापीठ, मा.डॉ.चेतना सोनकांबळे, अधिष्ठाता, आंतरविद्याशाखा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, मा.डॉ.लता मोरे माजी अधिष्ठाता, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव हे प्रमुख पाहुणे तर विशेष अतिथी म्हणूनमा.श्री.यजुर्वेद्र महाजन, दीपस्तंभ संस्था, जळगाव हे मान्यवर उपस्थित होते.मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकण विभागातून एकूण ११९ अर्ज प्राप्त झाले त्यापैकी २६ उत्कृष्ट शिक्षकांना आदर्श विद्यारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच यातील मा.आरती वर्मा यानां या वर्षीचा माहेर पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.नानासाहेब विसपुते यांनी आदर्श पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात संस्थेच्या सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.