International YOGA Day 2020 Online Programme

२१ जून, 2020 योग दिनाचे औचित्य साधून २१ जून जागतिक योग दिवसाची जनजागृती व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन. य.च.म.मु.विद्यापीठ, मुंबई विभागीय केंद्र व आदर्श शैक्षणिक समूह संचलित, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते बी.एड्. महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन जागतिक योगा दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रस्तुत कार्यक्रमासाठी आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, य.च.म.मु. विद्यापीठ, नाशिक, मुंबई विभागीय संचालक , मा.डॉ.वामन नाखले, मा.डॉ.बी.के.सुजाता दीदी, मा.श्री.टी.के.सोनवणे, मा.श्रीम.रागिणी पाटील, मा.डॉ.जान्हवी खरमासे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे, डीएसएमचे सर्व विद्यार्थी व कर्मचारी हे उपस्थित होते. डी.एस.एम.च्या विद्यार्थ्यानी योगा आसन व प्राणायाम यावर तयार केलेली चित्रफित दाखवून योगावर आधारित प्रश्न मंजूषाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. *आरोग्य हिच धनसंपदा* शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कसे चांगले राहील याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी माऊंट अबु येथील प्रमुख वक्त्या मा.डॉ.बी.के.सुजाता दिदी यांनी आपला आहार, विहार कसा असावा? योगा ने शरीर चांगले राहते… तर मेडिटेशनने मनाचे स्वास्थ्य चांगले राहते. अशा आपल्या प्रेरक शब्दातुन बहुमोल असे मार्गदर्शन केले. Zoom व YouTube वर ६९७ विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.