Rajashree Chhatrapati Shahu Maharaj Jayanti 2020

रयतेचा राजा… लोककल्याणकारी लोकराजा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती… महाराष्ट्राच्या लाडक्या राजाला मानाचा मुजरा.. आदर्श शैक्षणिक समूहाच्या श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते एम.एड्. व बी.एड्. महाविद्यालयात दि.२६/०६/२०२० रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिन मोठया उत्साहात ऑनलाईन आयोजित करण्यात आला. आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते सर व संचालिका मा.सौ.संगिता विसपुते मॅडम यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी आपल्या प्रेरक शब्दातुन छ.शाहू महाराजांच्या कार्याची महती वर्णन केली… शिक्षण क्षेत्रातील छ.शाहू महाराजांचे विचार, ऐक्य , परस्पर प्रेम, विश्वास व चिकाटीचे सतत प्रयत्न ही आमची शस्र असली पाहिजेत असे शाहू महाराजांचे विचार त्यांनी सर्वांसमोर मांडले व आजच्या काळात त्यांचे विचार किती उपयुक्त आहेत ते विविध उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचे महत्व व लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची महती व कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आले.