Vachan Prerna Din Aani Jagatik Vidyarthi din 2020

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, श्री बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एजुकेशन, नविन पनवेल तर्फे दि. १५-१०-२०२० रोजी भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या ८९ व्य जन्मदिनी मुंबई मराठी अध्यापक संघ व श्री बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एजुकेशन, नविन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला वाचन महोत्सव जिथे दिसते पुस्तक, तिथे व्हावे नतमस्तक या उक्तीनुसार वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी दुपारी १.वाजता एका प्रेरणादायी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यापूर्वी सकाळी ११ वाजता आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. धनराजजी विसपुते सर व संचालिका मा. सौ. संगीता विसपुते मॅडम यांनी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रस्तुत ऑनलाईन कार्यक्रमाचे उदघाटन मा .आमदार निरंजनजी डावखरे, कोकण पदवीधर मतदार संघ यांच्या हस्ते झाले आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. धनराजजी विसपुते हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. वाचनातून स्व ची निर्मिती कशी करता येईल यावर मा. प्राची साठे, मा. विशेष कार्याधिकारी व शैक्षणिक सल्लागार यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मा. राजीव तांबे, प्रसिद्ध बालसाहित्यिक यांनी त्यांचा विचारातून आपण का वाचतो आणि वाचन म्हणजे नेमके काय? यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या पुढच्या भागात मा. एकनाथ आव्हाड, जेष्ठ बालसाहित्यिक यांनी कथा कवितांचे अभिवादन कसे करावे यावर अतिशय मौल्यवान मार्गदर्शन केले.महाविद्यालायच्या प्राचार्य डॉ. सीमा कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करुंन दिली. प्रस्तुत कार्यक्रमासाठी झूम व फेसबुकच्या माध्यमाने १००० च्या वर प्रेक्षक उपस्थित होते.