National Webinar on Challenges and Remedies before Higher Education Institutions in India: Post COVID-19 Pandemic Periods

कोविड -१९ या जागतिक समस्येला सर्व विश्वाला सामोरे जावे लागत आहे, या समस्येला तोंड देत असतांना त्यातून मार्ग शोधणे व यशस्वीतेकडे वाटचाल करणे, ही काळाची गरज आहे. आदर्श शैक्षणिक समूह संचलित, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेल, हे महाविद्यालय अशाच पद्धतीने सध्या कार्यरत आहे. या काळात महाविद्यालयामार्फत अनेक कार्यक्रमांचे व वेबिनारचे आयोजन करण्यात आले, याचाच एक भाग म्हणजे बुधवार दि. १७.०६.२०२० रोजी आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय परिसंवाद…
श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन व बाबासाहेब डॉ.आंबेडकर टीचर्स असोसिएशन (BDATA) यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मा.श्री. धनराजजी विसपुते, चेअरमन, आदर्श शैक्षणिक समूह, मा.डॉ.मनिषा कायंदे M.L.C. महाराष्ट्र राज्य प्रवक्ता शिवसेना, मा.डॉ.संजय जगताप, उच्च शिक्षण सहसंचालक, कोकण विभाग, पनवेल, या कार्यक्रमाचे संयोजक मा.डॉ.अविनाश शेंद्रे, अध्यक्ष, BDATA , मा.डॉ.भटू वाघ, खजिनदार, BDATA , मा.डॉ.सीमा कांबळे, प्राचार्या, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर वेबिनारसाठी देशभरातून व परदेशातून १२०० हुन अधिक सदस्यांनी नोंदणी केली होती.