Coffee आणि बरंच काही…Interaction with Celebrities

लॉकडाऊनच्या कालखंडात आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श समूहाच्या बी.एड.महाविद्यालयाने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले याचाच एक भाग म्हणजे दि.१४/०५/२०२० रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मा.श्रीम.सारिका नवाते यांच्याशी बी.एड.व एम.एड.च्या विद्यार्थ्यांनी zoom वर दुपारी ४.०० ते ५.३० या वेळेत online मनसोक्त गप्पा मारत ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करायचे हे समजून घेतले. प्रसिद्ध अभिनेत्री मा.श्रीम.सारिका नवाते, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, संचालिका मा.सौ.संगिता विसपुते, मा.श्री.नानासाहेब विसपुते , डॉ.सीमा कांबळे सर्व स्टाफ व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला..