Exclusive Online NET SET Guidance webinar for NET SET aspirants

आदर्श शैक्षणिक समूह संचलित, श्री.बापूसाहेब डी. डी. विसपुते बी.एड.व एम.एड.महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या “ज्ञानांजली. तीन दिवसीय सेट/नेट मार्गदर्शन ऑनलाइन(Webinar) परिसंवाद” चे उदघाटन व पहिले पुष्प दि.०८/०५/२०२० रोजी दुपारी ३.०० वाजता विविध मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत गुंफण्यात आले..प्रस्तुत कार्यक्रमासाठी आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, मा.सौ.संगिता विसपुते, मुंबई विद्यापीठ, ठाणे उपविभागाच्या डायरेक्टर मा.डॉ.सुनीता मगरे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.नानासाहेब विसपुते, कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मा.डॉ.सुनिता मगरे यांनी आदर्श समूहाच्या बी.एड्. महाविद्यालयाचे कौतुक करत सेट व नेट विषयी उपस्थित सर्वांना सखोल मार्गदर्शन करत एक नवी दिशा दिली.. श्रीम.धनश्री कदम यांनी पहिले पुष्प गुंफत सेट व नेट च्या पहिल्या पेपर विषयी सर्वांना सखोल मार्गदर्शन केले दि.०९/०५/२०२० रोजी दुपारी ३.०० ते ३.४० या कालावधीत मा.डॉ.ज्ञानेश्वर मगर यांनी सर्वांना सेट/नेट चा दुसरा पेपर व अभ्यासाची तंत्रे यावर मार्गदर्शन केले. ३.४० ते ४.४० या वेळेत मा.डॉ.स्वप्निल निर्मळ यांनी पहिला व दुसरा पेपर याची तयारी व काही प्रेरणात्मक तंत्रांवर प्रकाश टाकला. रविवार दि.१०/०५/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता मा.डॉ.रावसाहेब शेळके यांनी या परीक्षाना सामोरे जाताना काय केले पाहिजे या बाबत सखोल मार्गदर्शन केले. ११.४० ते १२.२० या वेळेत पुन्हा मा.श्रीम.धनश्री कदम यांनी सर्वांना पहिल्या पेपर विषयी सखोल माहिती दिली…