National Seminar – Nai Talim 2019

“राष्ट्रीय परिसंवाद… नई तालीम… एक नवीन दृष्टिकोन…” महात्मा गांधी ग्रामीण शिक्षण परिषद, मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार, मुंबई विद्यापीठ, शिक्षणशास्र विभाग आणि श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते बी.एड./एम.एड. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०१/१०/२०१९ रोजी “अनुभवात्मक अध्ययनाच्या माध्यमातून नई तालीम” या विषयावर यशस्वीरित्या एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले…
आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते हे नेहमीच नाविन्याचा शोध घेत असतात व नवप्रवाहांचा स्वीकार करून त्याच्या अंमलबजावणी करिता आग्रही असतात… त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाने बी.एड. महाविद्यालय नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करीत असते, या उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांना एक नवी दृष्टी देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. मा.डॉ.सुनीता मगरे, प्रभारी संचालक, ठाणे उपकेंद्र आणि अध्यक्ष, अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ, मुंबई, महात्मा गांधी ग्रामीण शिक्षण परिषदेचे स्पेशल ड्युटी ऑफिसर मा.श्री.प्रभाकर बनाला, डी.एड. विभागाच्या प्राचार्या श्रीम.कुसुम मधाळे व बी.एड/ एम.एड.च्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांच्या उपस्थितीत महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन व झाडाला पाणी घालून पर्यावरण पूरक पद्धतीने परिसंवादाचे उदघाटन करण्यात आले. प्रस्तुत प्रसंगी डॉ.सुनिता मगरे यांनी उपस्थितांना मूल्य व शिक्षण प्रणाली याबाबत मार्गदर्शन करत नई तालीम ही संकल्पना स्पष्ट केली व आदर्श समूहाच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले… यानंतर दोन सत्रांमध्ये सदर परिसंवाद पार पडला. संस्थेच्या सचिव मा.सौ.संगीता विसपुते यांच्या उपस्थितीत सदर परिसंवादाचा समारोप समारंभ पार पडला. या राष्ट्रीय परिसंवादातून प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाची सर्वांना अनुभूती मिळाली.