Inauguration of Paralegal Clinic

आदर्श शैक्षणिक समूहाच्या संचालिका मा. संगिताजी विसपुते मॅडम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एजुकेशन, नवीन पनवेल च्या VENTEL (Vocational Education Nai Talim Experiential Learning) सेल च्या अंतर्गत सामाजिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ग्रामीण व शहरी भागातील लोकांना कायद्याबद्दलचे प्राथमिक ज्ञान मिळावे व खासकरून महिलांना त्याच्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती व्हावी व त्यासंबंधीचे समुपदेशन मिळावे यासाठी दि. १२/१०/२०२० रोजी कौंटुबिक हिंसाचार व कायद्याचे संरक्षण ” या ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन व पॅरालीगल क्लिनिक चे उदघाटन करण्यात आले..या उपक्रमाच्या माध्यमातून विविध विधी तज्ज्ञ ऑनलाईन व प्रत्यक्ष उपस्थित राहूंन वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. महिलांना व समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळविण्यासाठी प्राथमिक मार्गदर्शन मिळावे व कायद्यांसंबंधी जनजागृती व्हावी या उद्देशाने हे पॅरालीगल क्लिनिक सुरु करण्यात येत आहे अशी माहिती आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन श्री. धनराजजी विसपुते सर यांनी सर्वाना दिली तसेच या उपक्रमाद्वारे महिलांना कायदेविषयक ज्ञान तर होईलच पण स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर व अत्याचारांवर नियंत्रण मिळवणेही याद्वारे शक्य होईल असे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सीमा कांबळे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमामध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ देवपूर, धुळे चे अध्यक्ष मा. महेन्द्रजी विसपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणू मा.सौ.चित्राताई वाघ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी,मुंबई ह्या लाभल्या. मा.श्रीम.अॅड रश्मी जाधव हायकोर्ट मुंबई यांनी कार्यक्रमात महिला कायद्यांविषयी मार्गदर्शन केलेत्यानंतर आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. धनराजजी विसपुते सर यांनी महिला सबलीकरणासाठी संस्थेतर्फे केल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्दल सर्वाना माहिती दिली. ह्या कार्यक्रमासाठी झूम व फेसबुक च्या माध्यमातून सुमारे १००० सहभागींनी आपली उपस्थिती नोंदवली