Voting Awareness Program

“विसपुते बी.एड्. महाविद्यालयात
मतदान जनजागृती कार्यक्रम…”
सत्य और ईमान से, सरकार बने मतदान से…
हे अगदी सत्य आहे. मतदान करणे हा प्रत्येकाचा जसा अधिकार आहे तसेच प्रत्येकाचे कर्तव्य आहे. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार दि.२१/१०/२०१९ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र मतदान आहे, याच धर्तीवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, याकरिता आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व सखोल मार्गदर्शनाखाली आज दि.१३/१०/१९ रोजी रायगड जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मा.डॉ.कालिदास शिंदे, संरक्षण अधिकारी मा.श्री.राम म्हस्के व बी.एड्. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृती कार्यक्रम पार पडला.
प्रस्तुत प्रसंगी डॉ.कालिदास शिंदे यांनी “सोडा सारे काम धाम, मतदान करणे पहिले काम” असे म्हणत सर्वांना मार्गदर्शन केले, तर डॉ.सीमा कांबळे यांनी राज्यघटनेतील विविध तरतुदींचा संदर्भ देत “निर्भय होऊन मतदान करा, देशाचा सन्मान करा” असे म्हणत मतदानाचे महत्व स्पष्ट करत सर्वांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले… या प्रसंगी सर्वांनी एक जागरूक नागरिक म्हणून दि.२१/१०/२०१९ रोजी मतदान करण्याचा दृढ निर्धार केला…