Education System is Changing

“शिक्षण प्रणाली बदलतीय…”
अनेक घटकांच्या प्रभावामुळे शिक्षण प्रणाली बदलतीय… याच धर्तीवर शिक्षण प्रणालीतील हे बदल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते… त्यातही पाश्चात्य शिक्षण पद्धतीविषयी मनात अनेक प्रश्न असतात… याचीच उत्तरं शोधण्यासाठी बोस्टन येथे शिक्षण घेत असलेली आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते व संचालिका सौ.संगिता विसपुते यांची कन्या कु.धनश्री विसपुते यांच्याशी आज बी.एड्. महाविद्यालयातील विद्यार्थींनीनी संवाद साधत “बोस्टन व भारतीय शिक्षण प्रणालीतील” फरक जाणून घेतला… कु.धनश्रीने अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे देत सर्वांना एक नवी दृष्टी दिली… अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या संवादातून व विचारमंथनातून बोस्टनची शिक्षण प्रणाली सर्वांच्या ध्यानात आली… शिक्षण प्रणाली खरचं खूप बदलतीय याची अनुभूती सर्वांनी घेतली…