Scientific Development Program

“वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासाकरिता… नेहरू विज्ञान केंद्र, वरळी व नेहरू तारांगण येथे क्षेत्रभेट” “विज्ञान मानवतेला मिळालेली एक सुंदर भेट आहे… आपण ती विकृत करू नये.”
– डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
२०२० चा समृद्ध भारत घडण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे… नवीन पिढी सुसंस्कृत बनली पाहिजे… आणि यासाठी भविष्यातील होऊ घातलेला शिक्षक हा वास्तववादी विचारांचा असावा हे ध्येय ध्यानात घेऊन दि.२५/०८/२०१९ रोजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपूते यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांच्या उत्कृष्ठ नियोजन व मार्गदर्शनाखाली क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. सदर क्षेत्रभेटीत बी.एड्. व्दितीय वर्षाच्या ५० विद्यार्थीनी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. नेहरू विज्ञान केंद्र (एन.एस.सी.) हे भारतातील सर्वात मोठे परस्परसंवादी विज्ञान केंद्र आहे. या भेटीत सर्वांनी अनेक वैज्ञानिक चमत्कार व त्याच्यामागील वैज्ञानिक तथ्य याबद्दल माहिती घेतली, त्यानंतर नेहरू तारांगणला देखील भेट दिली.
एक नवा दृष्टीकोन वृद्धिंगत करून, सक्षम शिक्षक घडविण्याचा आद.धनराजजी विसपुते सरांचा मानस सत्यात उतरविण्याचा हा एक प्रयत्न…