Rashtrapita Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri Jayanti-2020

दि. २ ऑक्टोबर २०२० रोजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. बापूसाहेब डी. डी विसपूते कॉलेज ऑफ एज्युकेशन ,नवीन पनवेल येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन, मा. श्री.धनराजजी विसपुते सर , संस्थेच्या सचिव मा.सौ.संगिता विसपुते मॅडम तसेच बी.एड.,एम.एड.महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.डॉ.सीमा कांबळे मॅडम , बालवाडी विभागाच्या प्राचार्या श्रीम.जाई जगताप मॅडम , वसतिगृहाच्या प्रमुख श्रीम.कांचन देशमुख मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ठिक ९.३० वा.प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास बी.एड.एम.एड. महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते