मदत करणाऱ्या हातांचा सन्मान

“मदत करणाऱ्या हातांचा सन्मान…”
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी महापूर आला… मोठ्या प्रमाणात वित्तहानी व प्राणहानी झाली… यावेळी सर्वांनी खारीचा वाटा उचलत मदतीचा हात पुढे केला… माणुसकीची सकाळ सर्वांच्या मनात उगवावी म्हणून सकाळ वृत्तपत्र समूहातर्फे “साथ द्या, हात द्या” ही योजना राबविण्यात आली.
शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख व ठसा असलेले आदर्श शैक्षणिक समूह सामाजिक क्षेत्रात देखील सतत कार्यरत असते… या संकटाच्या समयी “मदत नाही… ही तर जबाबदारी…” असे म्हणत आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते व संचालिका सौ.संगिता विसपुते यांनी ही जबाबदारी स्वीकारत आपला हात पुढे केला. पूरग्रस्तांकरिता अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू सकाळच्या माध्यमातून पाठविल्या, या वेळी बी.एड्. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील जमा झालेल्या वस्तू वेगवेगळ्या करणे, साहित्याचे प्रकारानुसार वर्गीकरण व बांधणी करणे ही कामे केली…
आदर्श समूहाच्या या कार्याची दखल घेत सकाळ वृत्तपत्र समूहामार्फत प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री क्रांती रेडकर, मा.श्री.रामदास शेवाळे, मा.श्री.रवी आमले, मा.श्री.संजीवन म्हात्रे यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते आदर्श समूहाला सन्मानित करण्यात आले…