Swachh Bharat Abhiyan

परिसंवाद…
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये स्वछताविषयक उपक्रम लोकाभिमुख होण्याकरिता आज दि.२०/०७/२०१९ रोजी आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली इन्फिनिटी फाऊंडेशनच्या माध्यमातून श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते बी.एड्. महाविद्यालयात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. प्रस्तुत परिसंवादात इन्फिनिटी फाऊंडेशनचे चेअरमन अयुफ अकुला यांनी उपस्थितांना स्वच्छताविषयक विविध बाबींवर मार्गदर्शन केले तर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी सर्व सदस्यांचे स्वागत करत आदर्श समूहाच्या वतीने आभार व्यक्त केले…