Ek Haat Madaticha

*एक हात सहकार्याचा,*
*एक प्रयत्न माणुसकीचा*

*कोल्हापूर* आणि *सांगली* या भागांमध्ये झालेल्या पुरजन्य परिस्थितिचा खूप मोठा फटका आपल्या सर्व बांधवाना बसलेला आहे. आपण प्रत्यक्षरित्या जरी तिथे मदत करू शकत नसलो तरी आपण अन्य मार्गानी त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते व संचालिका सौ.संगिता विसपुते हे दाम्पत्य नेहमीच कार्यरत असते… याच हेतूने ही *मदत नाही तर ही जबाबदरी* आहे असे म्हणत आज दि.१०/०८/२०१९ रोजी कोल्हापूर वासीयांसाठी सकाळ व साम वहिनीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू पाठविल्या आहेत. यावेळी बी.एड्. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी देखील सकाळ कार्यालयातील जमा झालेल्या सर्व वस्तू वेगळ्या करण्याचं काम केलं. या वेळी इतर सर्वांनी देखील मदतकार्यात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करावा व माणुसकीच्या नात्याने सर्वांनी एक पाऊल पुढे टाकावे ज्यांना मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया मदत करावी असे आवाहन आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी केले आहे.