National Librarian Day 2020

आदर्श शैक्षणिक समूहाचे, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेजऑफ एज्युकेशन, नविन पनवेल व बोर्ड ऑफ स्टडीज, शिक्षणशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२/०८/२०२० रोजी “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस” हा कार्यक्रम ऑनलाइनआयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते YCMOU नाशिकचे ग्रंथालय विभागाचे प्रमुख मा.डॉ.मधुकर शेवाले सर, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते सर, मुंबई विद्यापीठ, ठाणे सब कॅम्पस च्या डायरेक्टर मा.डॉ.सुनिता मगरे मॅडम, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे मॅडम, आणि त्यांचा सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी आदर्श समूहाची ग्रंथालया संदर्भातील भूमिका स्पष्ट करत आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार काय नवीन स्वीकारता येईल यावर भाष्य करत सर्वांना एक नवी दिशा दिली तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.डॉ.मधुकर शेवाले सर यांनी ग्रंथालय शास्त्रातील अनेक बाबींवर भाष्य करत ग्रंथालयाचे व ग्रंथपालांचे महत्व विषद केले व सर्वांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या.