Satarkata Janjagruti Karyakram 2020

सतर्क भारत , समृद्ध भारत …या 2020 वर्षातील केंद्रीय सतर्कता आयोगाने दिलेल्या घोषणेच्या आधारावर सतर्कता जनजागृति कार्यक्रम व भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ह्या कार्यक्रमाचे औचित्य साधुन दिनांक 2.11.2020 रोजी आदर्श शैक्षणिक समूह संचलित, श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज न्यू पनवेल, मुंबई विद्यापीठ ठाणे सबकॅम्पस व पंडिता रमाबाई मुलींचे वसतीगृह मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सतर्क जागरूकता ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी,मा. श्री. रमेश चव्हाण नवी मुंबई,लाचलूचपत प्रतिबंधक ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक, मा.डॉ. सुनिता मगरे मॅडम,ठाणे उपकेंद्र, मुंबई विद्यापीठाच्या संचालिका, मा. श्री. धनराज विसपुते आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे मॅडम तसेच प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल दीपप्रज्वलनाने करण्यात आली. मा.डॉ. सुनिता मगरे मॅडम यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविका द्वारे कार्यक्रमाचे उद्दिष्टये व रूपरेखा स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि मा. रमेश चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनाद्वारे सतर्कता जागरूकता कार्यक्रमाचे महत्व लाचलूचपत प्रतिबंधक कार्यप्रणाली व जनतेमधे सतर्कतेबद्दल आवश्यक असलेली जागरूकता यावर बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. धनराजजी विसपुते यांनी सतर्कता जागरूकता कार्यक्रमामधे शैक्षणिक संस्था व विद्यापीठ यांची असलेल्या भूमिका व जबाबदाऱ्या,तसेच तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता यावर आपले मोलाचे विचार मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. सीमा कांबळे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सावंत यांनी केले. एम. एड. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी अपर्णा पार्सेकर यांनी सर्वांना सतर्कता जागरूकतेची शपथ दिली.
कार्यक्रमासाठी Zoom व Facebook माध्यमातुन जवळपास 2000 विद्यार्थांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.