Mahatma Gandhi yanchya Swapnatil Swayampurn Bharat – Nai Talim Online – 2020

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल, नवी मुंबई व मुंबई विद्यापीठ ,ठाणे उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ” महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण भारत – नई तालीम” या ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी मा. निधीजी चौधरी व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार च्या मा.मनिषाजी करपे ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला व सर्वांचे स्वागत केले. मा. निधीजी चौधरी मॅडम यांनी महात्मा गांधींचे विचार आजच्या पिढीसाठी किती महत्वपूर्ण आहेत ते स्पष्ट केले त्यानंतर मा. मनीषाजी करपे मॅडम यांनी महात्मा गांधी व नई तालीम यातील संबंध स्पष्ट केला. मुंबई विद्यापीठ ठाणे उपकेंद्राच्या संचालिका डॉ. सुनीता मगरे यांनी विद्यापीठाची यातील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री. धनराजजी विसपुते होते त्यांनी महात्मा गांधींच्या विचार व प्रेरणेनुसार आदर्श शैक्षणिक समूह कार्य करत असल्याचे स्पष्ट केले व भविष्यातही यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमासाठी झूम वर १०० व फेसबुक वर ३ हजार ३१४ इतक्या संख्येने सहभागी उपस्थित होते.