Vachan Prerna Din

“विसपुते बी.एड.महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन…”
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित, भारताचे माजी राष्ट्रपती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्षेपणास्त्र ध्येयवेडे संशोधक डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो.
याचेच औचित्य साधून आज दि.१५/१०/२०१९ रोजी आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार, श्री.बापूसाहेब डी. डी. विसपुते बी.एड.महाविद्यालयात ” वाचन प्रेरणा दिनाचे ” आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त आज ग्रंथालयातील काही जुन्या पुस्तकांची शिस्तबद्ध मांडणी करून ती सर्वांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली, आज या निमित्ताने सर्वांनी हे ग्रंथ पाहून त्याची माहिती करून घ्यावी हा यामागील उद्देश होता . या नंतर सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी एक तास ग्रंथालयात बसून वाचन केले व नंतर वाचलेल्या आशयावर चर्चा केली……मोबाईलच्या युगात सर्वांनी वाचन संस्कृती जपावी हा संदेश देत या कार्यक्रमाची सांगता झाली……