पनवेल डी . डी. विसपुते महाविद्यालयाचे घवघवीत यश !….

श्री. बापूसाहेब डी . डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन , नवीन पनवेल येथील मुंबई विद्यापीठ अंतर्गत एम . एड. अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहीर झाला. सदर परिक्षेत आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थीनी श्रीमती व्हीनस समिर सावळा हीने एकूण ८२.७६% मिळवत मुंबई विद्यापीठात व्दितीय स्थान पटकावले आहे. संस्थेचे चेअरमन मा. श्री. धनराज देविदास विसपुते व सेक्रेटरी मा. श्रीमती संगिता धनराज विसपुते यांनी सदर विद्यार्थीनी व कॉलेजच्या प्राचार्या मा. डॉ. सीमा कांबळे आणि एम.एड विभागातील सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन व कौतुक केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.