“यिन” च्या निवडणुकीत श्री.बापुसाहेब डी.डी. विसपुते शिक्षणशास्र महाविदयालाच्या विदयार्थ्यांची निवड

“सकाळ”च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या यंग इन्सिरेटर्स नेटवर्क अर्थात “यीन”च्या पहिल्या टप्यात घेण्यात आलेल्या, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते शिक्षणशास्र महाविदयालय पनवेलतर्फे बी.एड. द्वितीय वर्षाच्या तारिणी मोरे यांची अध्यक्षपदी व गौरी उबाळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.या निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस असे मतदान झाल्याने दिसून आले विशेष म्हणजे प्रथमच ह्या निवडणुकीत बी.एड. महाविदयालयाचा समावेश करण्यात आला होता.ह्या निवडणुकीचा निकाल रविवारी सांयकाळी ”यिन” च्या अॅपवर जाहीर करण्यात आला. यंदा कोरोनाचे निर्बंध असल्याने ही निवडणूक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. महाविदयालयाच्या विदयार्थ्यांनी मिळवलेल्या ह्या यशाबद्दल सर्वांकडे कौतुक होत आहे.आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री. धनराजजी विसपुते, संचालिका सौ.संगिता विसपुते मॅडम यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या अॅड. डॉ. सीमा कांबळे, सर्व प्राध्यापक व विजयी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गौरी उबाळे

तारिणी मोरे