भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल तर्फे दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११.०० वाजता आदर्श शैक्षणिक समूहाच्या संचालिका सौ.संगीता विसपुते यांच्या हस्ते संस्थेच्या मुख्य कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दुपारी ३.०० वाजता ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रस्तुत कार्यक्रमासाठी श्री. बापूसाहेब डी. डी.विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन च्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे, सर्व प्राध्यापक आणि बी.एड.व एम.एडचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते व्हर्चुअल पद्धतीने दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रा. नेहा म्हात्रे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महान अशा कार्याचे महत्व सांगितले. यानंतर सर्व उपस्थितांचे आभार मानून मा न्यवरांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.