B.Ed. and M.Ed. Opening 2022

आदर्श शैक्षणिक समूह संचालित श्री.बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये बी.एड व एम.एड. वर्ष 2021-23 चे उदघाटन आणि मराठी दिवस ऑनलाईन पद्धतीने जल्लोषात साजरा करण्यात आला.दि.27/02/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास मा.डॉ. सुनिता मगरे (प्राध्यापक व विभागप्रमुख,मुंबई विद्यापीठ ) हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.धनराजजी विसपुते(अध्यक्ष-आदर्श शैक्षणिक समूह,नवीन पनवेल) यांनी भूषविले तर संस्थेच्या संचालिका मा.सौ. संगिता विसपुते देखील या कार्यक्रमास उपस्थित होत्या तसेच बी.एड व एम.एड.च्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे,सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात महाविद्यालयाचा परिचय करून देण्यात आला. महाविद्यालयाने, प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशाची गौरवगाथा सादर करण्यात
,माय मराठीची महती सांगण्यात आली.प्राचार्य डॉ.सीमा कांबळे यांनी मराठी भाषा आपणास कशी अभिमानास्पद आहे हे आपल्या ओघवत्या शैलीत सांगितले आणि महाविद्यालयास मुंबई विद्यापीठ आणि मा. धनराजजी विसपुते यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल याची ग्वाही दिली. मा. सुनिता मगरे मॅडम यांनी महाविद्यालयाच्या कार्याचे खूप गुणगान केले आणि हे महाविद्यालय ऑनलाईन पद्धतीने नवनवीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यामध्ये प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय आहे असे सांगितले.सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मा.धनराजजी विसपुते यांनी मराठी भाषेविषयी असलेली अस्मिता आपल्या शब्दातून व्यक्त केली आणि नवीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.