Sanvidhan din 2022

श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल मध्ये संविधान दिनाचे आयोजन

“संविधानावर निष्ठा 
हिच व्यक्तीची प्रतिष्ठा”

आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये प्राचार्य अॅड डॉ. सीमा कांबळे यांच्या प्रेरणेने दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य अॅड डॉ. सीमा कांबळे सीमा कांबळे सर्व प्राध्यापक आणि बी.एड.द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय प्राचार्य अॅड डॉ. सीमा कांबळे सीमा कांबळे यांनी भूषविले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधानाचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. अॅड डॉ. सीमा कांबळे यांनी संविधान भारताला सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही,प्रजासत्ताक घोषित करते. याविषयी बहुमूल्य असे मार्गदर्शन करून संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अशा पद्धतीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.