Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2022

श्री.बापूसाहेब डी.डी विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

     आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉक्टर सीमा कांबळे यांच्या प्रेरणेने दिनांक 06 डिसेंबर रोजी सकाळी 10.030 वाजता महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सीमा कांबळे सर्व प्राध्यापक आणि शालेय पदविका शिक्षणक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय प्राचार्य डॉक्टर सीमा कांबळे यांनी भूषविले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमात डॉक्टर सीमा कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब यांचे वाचनाचे वेड आणि अथक परिश्रम याबद्दल माहिती सांगितली डॉक्टर बाबासाहेबांनी भारताचे संविधान तयार करण्यासाठी घेतलेली मेहनत याबद्दल विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. अशा पद्धतीने महाविद्यालयामध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.