शालेय व्यवस्थापन पदविका व ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी या  शिक्षणक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या परिचय सत्राचे आयोजन

आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन,नवीन पनवेल मध्ये मा.श्री. धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने दि. २०  नोव्हेंबर २०२२ रोजी   सकाळी ११.०० वाजता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक मुंबई विभागीय केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय व्यवस्थापन पदविका व ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी या शिक्षणक्रमाच्या परिचय सत्राचेआयोजन  करण्यात आले. सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून  मा. श्री.अनिलजी बोरनारे, प्रदेश सहसंयोजक शिक्षक आघाडी भाजप, महाराष्ट्र राज्य, मा.श्री.धनराजजी विसपुते चेअरमन आदर्श शैक्षणिक समूह तथा प्रदेश सहसंयोजक, भारतीय जनता पार्टी, शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ ,श्री. बापूसाहेब डी.डी विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या  प्राचार्या  मा.डॉ. सीमा कांबळे व  सर्व प्राध्यापक आणि  शालेय व्यवस्थापन पदविका व ग्रंथालय व माहितीशास्त्र पदविका शिक्षणक्रमास प्रवेशित १८० (१७०+१० माजी विद्यार्थी) विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून  समारंभाचा शुभारंभ करण्यात आला.   प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी आपल्या सुंदर वक्तृत्व शैलीत विद्यार्थ्यांना सतत शिक्षण घेण्यासाठी व आजन्म विद्यार्थी राहण्यासाठी प्रेरणा दिली. मा.श्री.अनिलजी बोरणारे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि शिक्षकांना येणाऱ्या समस्या व त्यावर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने विविध प्रयत्न करून कशा समस्या सोडवल्या याबद्दल त शिक्षकांना बहुमोल असे मार्गदर्शन  केले.  मा.श्री. धनराजजी विसपुते यांनी आदर्श शैक्षणिक समूह संस्थेची विविध वैशिष्ट्ये सांगून  शैक्षणिक क्षेत्रात  केलेले कार्य स्पष्ट केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

दुपार सत्रामध्ये शालेय व्यवस्थापन पदविका  शिक्षणक्रमाचे उद्बोधन प्रा.श्री. विनायक लोहार यांनी केले तसेच ग्रंथालय व महितशास्त्र पदवी शिक्षणक्रमाचे उद्बोधन प्रा. नेहा म्हात्रे यांनी केले. प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी कृतीसंशोधन विषयी उद्बोधन केले. या नंतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले व सम्पर्क सत्राची सांगता झाली.

उपस्थित विद्यार्थीशालेय व्यवस्थापन पदविकाग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी
15515
उपस्थित समंत्रक 2107
उद्घाटकमा.श्री.अनिलजी बोरनारे प्रदेश सहसंयोजक, शिक्षक आघाडी भा.ज.प. महाराष्ट्र राज्य