४ दिवसीय बी.एड व एम.एड. प्रवेश परीक्षा मार्गदर्शन चर्चासत्र

महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार बी.एड. व एम.एड. प्रवेशासाठी प्रवेशपूर्व (CET) परीक्षा देणे अनिवार्य आहे. प्रवेशपूर्व परीक्षा दिल्यानंतरच विद्यार्थी बी.एड. व एम.एड.प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. उच्च व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षा देणे आवश्यक आहे. या परीक्षेमध्ये विद्यर्थ्यांचीअभियोग्यता,बुद्धिमत्ता, तपासली जाते.आदर्श शिक्षण समूह संचालित श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एजुकेशन नवीन पनवेल आणि बोर्ड ऑफ स्टडीज (एजुकेशन)युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ४ दिवसीय बी.एड व बी.एड प्रवेश परीक्षा मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चा सत्रामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप, प्रक्रिया,परीक्षा केंद्र, परीक्षेचे पाठयक्रम या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.या चर्चासत्राचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मराठी,इंग्रजी, हिंदी या तिन्ही भाषेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. दि. १० ऑगस्ट २०२१ रोजी आदर्श शिक्षण समूह संचालित श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एजुकेशन नवीन पनवेल आणि बोर्ड ऑफ स्टडीज (एजुकेशन)युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ४ दिवसीय बी.एड व एम.एड. प्रवेश परीक्षा मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या उदघाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एड.ची विद्यार्थिनी राणीता वाज हिने केले. चर्चासत्राचे उदघाटनास आदर्श शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा.श्री धनराजजी विसपुते सर,बोर्ड ऑफ स्टडीज (एजुकेशन)युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई च्या अध्यक्ष मा. डॉ. सुनीता मगरे तसेच श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एजुकेशनच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे मॅडम हे मान्यवर उपस्थित होते . मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ व्हर्च्युल दीप्रज्वलनाने करण्यात आला. या चर्चा सत्राचे प्रास्ताविक बी.एड व एम. एड. महाविद्यलयाच्या प्राचार्या मा.डॉ. सीमा कांबळे मॅडम यांनी केले. तसेच या चर्चा सत्राचे उद्देश्य सांगून पुढील चार दिवसांचे नियोजन सांगितले.
या चर्चा सत्राचे प्रमुख अतिथी बोर्ड ऑफ स्टडीज (एजुकेशन)युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई च्या अध्यक्ष मा. डॉ. सुनीता मगरे यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.