वन महोत्सव २०२१

आदर्श शैक्षणिक समूहाने नेहमीच विविध कार्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे व या माध्यमातून समाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे. १ जुलै २०२१…आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री. धनराजजी विसपुते सर व मा.सौ.संगिता विसपुते मॅडम यांची कन्या कु.धनश्री विसपुते यांचा वाढदिवस या दिवसाचे औचित्य साधून व सामाजिक नियमांचे पालन करून श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल च्या प्रारंगणात वृक्षारोपण करण्यात आले व वृक्षसंवर्धनाचा निर्धार करण्यात आला. या वेळी कु. धनश्री यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी नुकतीच नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटी, बोस्टन, अमेरिका येथून एम. एस ही पदवी संपादन केली त्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले प्रस्तुत प्रसंगी मा.श्री.धनराजजी विसपुते सरांनी सर्वांना हा वसा जोपासण्याचे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सीमा कांबळे यांनी महाविद्यालयातर्फे वृक्षसंवर्धन कार्यक्रम कशाप्रकारे राबवला जातो याची माहिती सर्व उपस्थितांना करून दिली.