राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती व सामािजक न्याय दिवस ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नविन पनवेल च्या वतीने शनिवार दिनांक २६ जुन २०२१ रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती व सामािजक न्याय दिवस ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मा.डॉ. मिनाक्षी मोरे मॅडम जेष्ठ प्राध्यापिका, आचार्य जावडेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन गारगोटी मौनी विद्यापीठ कोल्हापूर ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. धनराजजी विसपुते व संचालिका मा. संगीताजी विसपुते व महाविद्यालयाच्या प्राचार्य मा.डॉ. सीमा कांबळे यांच्या उपस्थितीत हा ऑनलाईन कार्यक्रम पार पडला. महाविद्यालयाच्या प्राचार्य मा. डॉ. सीमा कांबळे यांनी आपल्या संबोधनातून छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला व शाहू महाराजांच्या कार्य किती मोलाचे होते ते आपल्या विचारांद्वारे सर्वांना सांगितले.