आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२१

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल तर्फे दि. २६/६/२०२१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रसिद्ध योग मार्गदर्शक मा. श्री. पीटर डिसूजा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी योगाबद्दल व यॊगाच्या आपल्या आयुष्यात असलेल्या महत्वाबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले तसेच योग प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वआदर्श शैक्षणिक समूहाचे संचालक मा. श्री. धनराजजी विसपुते सर यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. सीमा कांबळे मॅडम यांनी योग व आपली संस्कृती याबद्दल मार्गदर्शन केले. श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल अंतर्गत योग दिनाच्या निमित्त एक ध्वनीचित्रफीत सुद्धा दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एड प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी कल्याणी शिंदे यांनी केले.