‘वाचन दिन’ अंतर्गत एक आगळा वेगळा उपक्रम ‘वाचा एक तरी पुस्तक ‘

आदर्श शैक्षणिक समूहातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा खास उपक्रम
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री बापूसाहेब डी.डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय,नवीन पनवेल येथे दि. १९ जुन २०२१ रोजी ‘वाचन दिनाचे ‘आयोजन करण्यात आले होते. सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य मा. डॉ. सीमा मॅडम यांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते . यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचे सारांश सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ. ज्योती फाळके यांनी केले ,प्रास्ताविक सहा.प्राध्यापक अमीना शेख यांनी केले.प्राचार्या डॉ. सीमा कांबळे मॅडम यांनी सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना वाचनास प्रेरणा दिली. तसेच मा. श्री. धनराजजी विसपुते सरांनी या उपक्रमाची आणि सर्वांची प्रसंशा केली. कार्यक्रमाच्या शेवट ग्रंथपाल सौ. ज्योती फाळके यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.