Yoga Day 2019

२१ जून जागतिक योग दिन…

योग… ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना योगाची ही वाट दाखविण्याचे काम केले ते डॉ.नागेंद्र यांनी नासा वैज्ञानिक ते योग प्रसाराला वाहून घेतलेले व्रतस्थ जीवन, असा त्यांचा प्रवास केवळ वंदनीय असाच आहे. “स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान” च्या माध्यमातून डॉ.नागेंद्र यांनी आपले कार्य चालू केले.
“स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान”, “दै.मुंबई तरुण भारत”, आयुर्वेद संस्था व आरोग्य सेवा समिती आणि आदर्श शैक्षणिक समूहाचे श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.२१/०६/२०१९ रोजी योग दिनाचे औचित्य साधून… आदर्श समुहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली, आदर्श समूहाच्या देवद येथील संकुलामध्ये “योग आणि करियरच्या संधी” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
प्रस्तुत कार्यक्रमात मा.श्रीम.ममता राव यांनी २०० विद्यार्थ्यांना “योग व करियर” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दै.मुंबई तरुण भारतचे बिझनेस हेड मा.श्री.रविराज बावडेकर यांनी केले तर बी.एड्. विभागाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी आदर्श समूहाच्या वतीने उपस्थित सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित सर्वाना “योगा आणि करियर” या बाबत एक नवी दृष्टी मिळाली.