आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीतील महिलांची भूमिका” या विषयावरऑनलाईन व्याख्यान

आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. धनराजजी विसपुते यांच्या मातोश्री कै. कमलबाई देविदास विसपुते यांच्या ८ व्या पुण्यस्मरणा निमित्त (महिला सबलीकरण दिन) दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी “आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीतील महिलांची भूमिका” या विषयावरऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, महाराष्ट्र राज्य च्या प्रदेशाध्यक्षा मा. श्रीम. उमाताई खापरे यांनी महिला सबलीकरणाकडे देशाची होणारी वाटचाल व प्रयत्न तसेच महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार तर्फे केले जाणारे प्रयत्न व महिला सुरक्षा यावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धुळे चे अध्यक्ष मा.महेंद्रजी विसपुते (नानासाहेब) यांनी केले त्यानंतर मा. वंदनाताई सोनार, विश्वस्त आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. धनराजजी विसपुते यांनी आपल्या प्रेरक विचार द्वारे आदर्श शैक्षणिक समूहातर्फे महिला सबलीकरणासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाबद्दल सांगितले व आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. बापूसाहेब डी. विसपुते कॉलेज ऑफ एजुकेशन च्या प्राचार्य मा. डॉ. सीमा कांबळे यांनी केले. सदर कार्यक्रमास झूम व फेसबुक च्या माध्यमातून हजारोंच्या उपस्थितीत मान्यवर, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थीनी व विद्यार्थी उपस्थित होते