एक नवा आरंभ

” एक नवा आरंभ….”
प्रत्येक नवीन वर्ष एक नवा अनुभव देत असत….नवे विद्यार्थी….नवा दृष्टिकोन….नवी ऊर्जा….नवी दिशा आणि नवा उत्साह निर्माण करणारी नवी आव्हाने….या नव्या आव्हानांना सामोरे जाताना मिळतो तो नवा अनुभव….. हाच अनुभव घेण्यासाठी आज दि.१०/०९/२०१९ रोजी आदर्श समूहाचे खंबीर नेतृत्व मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ” शालेय पदविका अभ्यासक्रमाचे ” (डी. एस.एम.) उदघाटन मोठया उत्साहात संपन्न झाले. १२० नवीन प्रवेशित विध्यार्थी, ७० माजी विद्यार्थी व सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत तर आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री. धनराजजी विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली व बांठीया स्कुलचे मुख्याध्यापक मा.श्री.भगवानजी माळी सर, आदर्श समूहाच्या संचालिका सौ.संगिता विसपुते, कु.धनश्री विसपुते आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला….
गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार, मनोगत आणि उपस्थितांचे अमृततुल्य मार्गदर्शन या मुळे कार्यक्रम अधिक रंगत गेला ….पण खऱ्या अर्थाने कार्यक्रमात जिवंतपणा आला तो कु.धनश्री विसपुते यांच्याशी बी. एड.च्या विध्यार्थ्यांनी “बोस्टन व भारतातल्या शिक्षण पद्धती” संदर्भात साधलेल्या संवादामुळे व धनश्रीने दिलेल्या समर्पक उत्तरांमुळे……या नंतर मा.श्री.भगवान माळी सरांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले….कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. धनराजजी विसपुते यांनी आपल्या उत्साहपूर्ण शब्दांत सर्वांना मार्गदर्शन करून एक नवी दिशा दिली…..”आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, एकमेकांच्या हृदयात राहू त्या हृदयाला दार कशाला ” असे म्हणत डॉ.सीमा कांबळे यांनी सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली…..