रस्ता सुरक्षा अभियान २०२१

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. बापुसाहेब डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, पनवेल च्या वतीने गुरूवार दि. १८/०२/२०२९ रोजी सुरक्षा सप्ताह २०२१ अंतर्गत “रस्ता सुरक्षा जीवन रक्षा” ऑनलाईन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मा.श्री.संतोष जुवेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल, महाराष्ट्र चे मोटार वाहन निरिक्षक मा.धनराज शिंदे साहेब यांनी सर्वाना वाहन चालवतानाची खबरदारी व रस्ते वाहतूकीचे नियम यावर सखोल मार्गदर्शन केले. आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन मा.धनराजजी विसपुते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आदर्श शैक्षणिक समूहातर्फे दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह कशाप्रकारे राबविण्यात येतो याची सर्वाना माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.डॉ.सीमा कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. शरवरी शेडगे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे झुम व फेसबुक च्या माध्यमाने लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले व हजारो विद्यार्थी, विद्यार्थीनी व नागरीकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.