Coffee आणि बरंच काही… Season 3

मानवी मनावर आलेल्या ताणतणावाचे नियोजन करण्यासाठी दि.१६/०७/२०२० रोजी, संध्या.५.०० वाजता श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, नविन पनवेल, ने “Coffee आणि बरंच काही Season- 3” या कार्यक्रमात, कोविड-19 वर प्रतिबंधक उपाय व घ्यावयाची काळजी’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते. डॉ. निलेश कांबळे, टाटा हॉस्पिटल, मुंबई, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते सर, संचालिका मा.सौ.संगिता विसपुते मॅडम, महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. सीमा कांबळे, सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले टाटा हॉस्पिटलचे, हेल्थ फिजिशियन, मा. डॉ. निलेश कांबळे सर, यांनी कोविड-१९ याविषयी बोलत असतांना कोरोना हा जास्तीत जास्त ड्रॉपलेट (Droplets) मधून पसरू शकतो, तसेच आपण मास्क लावणे, हात वारंवार हैंडवॉश ने धुणे, या गोष्टींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे असे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण केले… आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन, मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी आपल्या मार्गदर्शनातून, काळ जरी कठीण असला तरी आपण त्यावर मात करू शकतो, या समस्येतूनच संधी निर्माण होतात, त्यामुळे खचून न जाता आपण याही काळात मार्गक्रमण केले पाहिजे असे सांगत सर्वांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण केला.