Guru Purnima 2020

आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते सर व संचालिका मा.सौ.संगिता विसपुते मॅडम, मुंबई विद्यापीठ, ठाणे सब कॅम्पसच्या डायरेक्टर मा.डाॅ.सुनिता मगरे मॅडम, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे व सर्व प्राध्यापक यांच्या उपस्थितीत दि.०५/०७/२०२० रोजी गुरुपौर्णिमेचे आॅनलाईन आयोजन करण्यात आलेमहाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी आपल्या प्रेरक शब्दातुन गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असून गुरूला सर्व शिष्य सारखेच असले पाहिजेत हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून सांगितले. त्यानंतर प्रमुख अतिथी मा.सौ.संगिता विसपुते मॅडम यांनी या कोरोना मध्ये सुध्दा विद्यादानाचे काम अविरत चालू ठेवणाऱ्या सर्व गुरूं विषयी कृतज्ञता व्यक्त केली व सर्वांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर मा.डॉ.सुनिता मगरे मॅडम यांनी गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, तसेच शिक्षक हा एक शेतकरी आहे, त्यांनी आपल्या चांगल्या विचारांचे पीक विद्यार्थ्यामध्ये रुजविले तर त्यांच्या कृतीमधून सवय-चारित्र्य-उत्तम संस्कृती तसेच शैक्षणिक उत्कृष्ठता निर्माण होते, असे सांगत सर्वाना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.धनराजजी विसपुते सरांनी सर्वप्रथम आपल्या आई व वडीलां विषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांनी निसर्ग व पर्यावरण हाच आपला गुरू आहे, गुरूसाठी त्यांचे वय महत्वपूर्ण नाही तर त्यांची योग्यता महत्वाची आहे, असे विचार मांडले व सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या माध्यमातून “अज्ञानाच्या अंधारातुन ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाणारी वाटचाल हीच तेजोमय असेल” असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.