ग्रंथालयशास्त्र व संशोधन विषयावर ऑनलाईन परिसंवाद

श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन व माजी विद्यार्थी संघ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, मुंबई विभागीय केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालयशास्त्र व संशोधन या विषयावर ३१/०३/२०२१ रोजी ऑनलाईन परिसंवाद कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विनायक लोहार सरांनी सादर केले. आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने सदर एकदिवसीय ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. संशोधनात ग्रंथालयाचे असलेले योगदान विद्यार्थ्यांना कळावे व संशोधनामध्ये ग्रंथालयाचा योग्य वापर करता यावा हे या ऑनलाईन परिसंवादाचे मुख्य उद्दिष्ट्ये होते कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक मा.श्रीमती.कादंबरी मांजरेकर ग्रंथपाल, बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, पाहणे या लाभल्या होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ.वामन नाखले सर, विभागीय संचालक मुंबई विभागीय केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व श्री.टी.के सोनवणे सर सहाय्यक कुलसचिव मुंबई विभागीय केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक हे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.डॉ.सीमा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादामध्ये श्री.डॉ.वामन नाखले सरांनी ग्रंथाबाबत व ग्रंथालयाबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती दिली त्यात त्यांनी ग्रंथाना मित्र करा जेणेकरून तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण मार्गदर्शक म्हणून काम करतो तसेच ग्रंथालयरुपी ज्ञान सागरात स्वतः चा समावेश करून घेवून स्वतः चा विकास करावा असे मत व्यक्त केले.श्री.टी.के सोनवणे सरांनी विद्यार्थ्यांना मुक्त ग्रंथालयाबाबत उपयुक्त माहिती दिली तसेच त्यांनी केंद्रांनी एकमेकांच्या भेटी घ्यावयात कारण सदरील केंद्राच्या ग्रंथालयात कोणत्या स्वरूपाचे वाचनसाहित्य आहे याची माहिती मिळते असे मत व्यक्त केले. मा.श्रीमती.कादंबरी मांजरेकर यांनी ग्रंथालयशास्त्र व संशोधन यावर इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांना दिली त्यात त्यांनी ग्रंथालयाचे तीन महत्त्वपूर्ण घटक ग्रंथ, वाचक, ग्रंथपाल अशी आहेत. संशोधनात ग्रंथ, विश्वकोश, वैज्ञानिक नियतकालिकातील लेख, वर्तमानपत्रातील माहिती कात्रण, ऑनलाईन रिसोर्सेस इत्यादीतून ग्रंथपाल माहिती पुरवतो म्हणून संशोधन संशोधनात ग्रंथापालास महत्त्व आहे. तसेच संशोधन प्रकल्प हा करताना विषय, आवाका, समाजास आयोग व मिळवलेले ज्ञान इ.बाबी लक्षात घ्याव्या व प्रकल्प हा सूची व कात्रण विषयावर करता येते असे मत व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.प्रितेश वाढे सरांनी मानून कार्यक्रम सर्वोत्कृष्ट रितीने संपन्न झाला असे जाहीर केले. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात ग्रंथालयशास्त्र व इतर शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.