आविष्कार २०२१

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपूते बी.एड./एम.एड. महाविद्यालय, पनवेल मधील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठ अंतर्गत १५ व्या आंतर महाविद्यालय/संस्था/विभाग “अविष्कार” संशोधन परिषद:२०२०-२१ द्वारे आयोजित संशोधन आराखडा स्पर्धेत अंतिम निवड प्रक्रियेत निवड झाली. सदर प्रक्रियेकरिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा निवृत्ती कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थी या गटातील मानवविद्याशाखा, भाषा आणि ललित कला या विभागामध्ये प्राध्यापकांनी – पदवीधरांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग व विद्यार्थ्यांनी – सद्य परिस्थितीतील शैक्षणिक पद्धती या विषयांवर संशोधन आराखडा पाठविला होता व त्यामध्ये प्राध्यापकांची व विद्यार्थ्याची निवड झोनल/जिल्हा पातळीवर करण्यात आली व सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांना विद्यापीठाकडून प्रमाणपत्र देण्यात आले.प्राचार्या डॉ. सीमा कांबळे, प्रा.विनायक विष्णू लोहार, प्रा.नेहा नरेंद्र म्हात्रे, प्रा.विजय वसंत मोरे, कु.धनश्री जाधव (विद्यार्थी), कु.स्नेहा पाटील (विद्यार्थी) यांनी पाठविलेल्या आराखड्याची पुढील स्तरासाठी निवड करण्यात आली. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपूते सर व संस्थेच्या सचिव, मा.सौ.संगिता विसपूते मॅडम यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.