भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२१

आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री बापुसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेल
येथ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर मा. जगदीशभाई गायकवाड व मा. विद्याताई गायकवाड, शिक्षण सभापती व नगरसेविका प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.धनराजजी विसपुते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व त्यानुसार देशाचा विकास कसा साधता येईल यावर आपले विचार व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या विचारांची प्रेरणा घेऊन तरुण व विद्यार्थी कशाप्रकारे यशस्वी होऊ शकतात यावर आपले विचार मांडलेत. कार्यक्रमामध्ये ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने झूम व फेसबुक च्या माध्यमातून उपस्थित होते.